
सावंतवाडी : माजगांव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये महाविकास आघाडीच्या गाव विकास पॅनेलचे प्रभाग क्रमांक ५ चे उमेदवार अमिश उर्फ बंटी चंद्रकांत कासार यांनी प्रचारात आघाडी घेतलं आहे. प्रभाग क्रमांक ५ पिंजून काढत आई-वडीलांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी झोकून काम करणार असून माजगावची जनता मला बहुमताने विजयी करणार, असा विश्वास अमिश कासार यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री कै. “भाईसाहेब सावंत" यांचा माजगांव गावाच्या विकासात राजकीय वारसा विचारात घेऊन निवडणुकीपुरते राजकारण व इतर कालावधीत गावाच्या विकासासाठी समाजकारण हेच माझे ध्येय व उद्दिष्ट राहील असं ते म्हणाले. दरम्यान, माजगाव येथील पाचही प्रभाग गाव विकास पॅनलनं पिंजून काढले आहेत. भाईसाहेब सावंत यांची प्रेरणा व ज्येष्ठ नेते विकास सावंत, युवा नेते विक्रांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डोअर टू डोअर'प्रचारावर भर दिला असून माजगावात १३ सदस्य अधिक सरपंच हे महाविकास आघाडीचे निवडून येणार असा विश्वास माजी उप सभापती चंद्रकांत कासार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी संजय कानसे, आबा सावंत, अमिश कासार, सुजाता राठवड, हेलन निब्रे, उदय शिरोडकर आदि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.