
सावंतवाडी : जंगलात बांधलेल्या स्थितीत सापडलेली अमेरिकन महिला तामिळनाडू येथून रोणापाल - सोनुर्ली सीमेवर आली कशी याचा तपास पोलीस करत आहेत. यात ही परदेशी महिला सिंधुदुर्गातल्या जंगलात येण्यापुर्वी गोवा येथील एका हॉटेल मध्ये एक दोन दिवस वास्तव्यास होती अशी माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून याबाबतची माहिती मिळत आहे.
याबाबत पोलीसांचा तपास सुरु आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बैठक घेत या प्रकरणी एसपी सौरभ कुमार अग्रवाल यांनी तपास कामातील सर्व अधिकार यांची बैठक बोलावली. त्यानुसार अधीक्षकांनी कामाचा आढावा घेऊन पुढील तपासाचाबाबत मार्गदर्शन केले. यात गोवा येथील वास्तव्याची माहिती मिळाल्याने तपासी यंत्रणेन वेग घेतला आहे.