
सावंतवाडी : गोव्याला जाणारी खासगी रूग्णावाहीका माजगाव येथे पलटी झाली. सुदैवाने आतील रुग्णांना मोठी दुखापत झाली नाही. जुना मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात घडला. वाहन समोर अचानक जनावर आल्यानं रूग्णवाहीका पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेत मदतकार्य सुरू केलं आहे.