
सावंतवाडी : सावंतवाडी येथे जिमखाना मैदानावर वयाच्या दहा - बारा वर्षांपासून लेदर बॉलचे धडे गिरवणारा सावंतवाडी शहरात वास्तव्य असणारा आणि जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोली मुळवंदवाडी येथील प्रथमेश पुंडलिक गावडेची मिडीयम फास्टर बॉलर म्हणून 19 वर्षाखालील खेळाडूंच्या बीसीसीआयच्या नॅशनल अकॅडमीच्या सराव शिबिरात राजकोट येथे त्याची निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एनसीए 19 वर्षाखालील मुलांच्या महाराष्ट्रातून आठ जणांची निवड झाली आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू असलेला प्रथमेश गावडे याची कॅम्प मध्ये सरावासाठी निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
वडील माजी सैनिक पुंडलिक गावडे, मामा माजी सैनिक रुपेश आईर व देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांनी त्याचे कौतुक केले आहे . प्रशिक्षक म्हणून अबू भडगावकर , दिनेश कुबडे यांनी त्याला धडे दिले आहेत .