
सावंतवाडी : सोमवार पासून श्रावण महिना सुरू होणार आहे. याच्या पूर्वसंध्येला गटारी अमावस्येनिमीत्त पर्यटकांनी आंबोलीत मोठी गर्दी केली आहे. शनिवारी, रविवारी फुल धम्माल करण्यासाठी पर्यटक आंबोलीत दाखल झालेत. त्यात पावसाचा जोर कायम असल्यानं पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत.
विकेंडला पर्यटकांची पावले आंबोलीकडे वळलीत. निसर्गरम्य हिरवागार परिसर, फेसाळणारे शुभ्र धबधबे, गडद धूक, थंडगार वार अशा वातावरणात विकेंड साजरा केला जात आहे. यातच गटारी अमावस्या आषाढ आली असून सोमवार पासून श्रावण सुरू होत आहे.
पुढील महिनाभर मद्यपान व मांसाहार वर्ज्य असणार आहे. त्यामुळे गटारीच्या दिवशी बहुतेक जण मांसाहार, मद्यपान करतात. पुढील महिनाभराचा बॅकलॉग गटारीला भरून काढला जातो. यातच शनिवार, रविवार आल्यानं पर्यटकांनी आंबोलीत धाव घेतली आहे. त्यात पावसाचा जोर कायम असल्यानं पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत.