
सावंतवाडी : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली आंबोली रविवारी पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होऊन गेली. या गर्दीमुळे आंबोली-बेळगाव राज्यमार्गावरील मुख्य धबधबा परिसर गर्दीन फुलून गेला होता. पोलिस बंदोबस्त असल्यानं वाहतूक कोंडी कमी प्रमाणात झाली होती.
शेकडोंच्या संख्येने आंबोलीत दाखल झालेल्यांनी वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. यात स्थानिक पर्यटकांसह गोवा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे आदी भागातून पर्यटक आले होते. या गर्दीमुळे मुख्य धबधबा परिसर हाऊसफुल्ल झाला होता.कावळेसाद पॉईंट येथेही पर्यटकांनी गर्दी केली होती. हिरण्यकेशी, महादेवगड येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. तेथेही पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. पोलीस बंदोबस्त असल्याने वाहतूक कोंडी कमी प्रमाणात झाली. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण स्वतः पेट्रोलिंग करीत असल्याने पोलिसांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली होती.