
▪️महाराष्ट्राच्या गडकरींमुळे वाढला विश्वास
सावंतवाडी : आंबोली घाटाला पर्यायी असणाऱ्या केसरी-फणसवडे-चौकुळ मार्गासाठी ६० कोटी रूपयांचा निधीची तरतूद सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अर्थसंकल्पातून सादर केली आहे. यामुळे आंबोली घाटाला एक सक्षम व सुरक्षित असा हा पर्यायी मार्ग मिळणार असून गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न आता मार्गी लागला आहे अशी माहिती भाजपा माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिली. या मार्गाचे शिल्पकार हे मंत्री रविंद्र चव्हाण असल्याच मत देखील श्री. गावडे यांनी यावेळी व्यक्त केल. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अर्थसंकल्प सादर करताना आंबोली घाटाला पर्यायी असणाऱ्या केसरी-फणसवडे-चौकुळ मार्गासाठी ६० कोटी रूपयांचा निधीची तरतूद केली आहे. साधारणतः सव्वा नऊ किलोमीटर चा हा रस्ता असणार आहे. वनविभाग, जागा हस्तांतरणासाठी वेगळ्या दहा कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे अशी माहिती संदीप गावडे यांनी दिली. तर याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे त्यांनी आभार मानले. आंबोली घाटाला एक सक्षम व सुरक्षित असा हा पर्यायी मार्ग असणार आहे. गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. पर्यटन जिल्ह्याला चालना देणारा नवा मार्ग यामुळे मिळणार असून आंबोलीसारखेच अद्भुत पर्यटन या मार्गावर देखील बघायला मिळणार आहे. यामुळे प्रवासाच अंतर देखील वाचणार आहे. गेली अनेक दशक ज्याची मागणी होत होती तो प्रश्न आता मार्गी लागला आहे. सार्वजनिक बांधकाम खात सिंधुदुर्गला मिळाल्यानंतर येथील विकास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. विकासाचा दृष्टीकोन बदलत आहे. आंबोली घाटाला पर्यायी मार्गामुळे सह्याद्रीची एक वेगळी ओळख जगासमोर येणार आहे. त्याचबरोबर आंबोली घाटाच संवर्धन देखील होणार असल्याचं मत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी व्यक्त केल. या मार्गाचे शिल्पकार हे मंत्री रविंद्र चव्हाण असल्याचे मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केल. केसरी भागाचे प्रतिनिधित्व करताना या मार्गासाठी संदीप गावडे यांनी देखील मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रवींद्र चव्हाण यांच्या या निर्णयानंतर तोंड गोड करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, श्री. गावडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या गडकरींमुळे वाढला विश्वास
जैवविविधता व निसर्गसंपन्नता लाभलेली महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून आंबोलीची ओळख आहे. परंतु, मागील २५ वर्षांत हा ब्रिटिशकालीन आंबोली घाट खचत चालला आहे. सतत कोसळणारी दरड हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आंबोली घाट मार्ग असुरक्षित बनल्यान पर्यायी मार्गाची मागणी होत होती. मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक येथून होते. भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंसाठी हा घाटमार्ग सोयीस्कर ठरतो. त्यामुळे घाटाला पर्यायी मार्ग असावा अशी मागणी होत होती. अनेकांनी यासाठी प्रयत्न केले. मात्र, हे स्वप्न स्वप्नच राहिले. यावेळी स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कोकणचे सुपुत्र रविंद्र चव्हाण यांनी या रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. महाराष्ट्राचे नितीन गडकरी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. जे शक्य नाही ते शक्य करून दाखवण ही त्यांची खासियत असल्यानं आंबोली घाटाला पर्यायी मार्ग ते प्रत्यक्षात साकारतील असा विश्वास सिंधुदुर्ग वासियांना आहे.