
सावंतवाडी : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल श्री क्षेत्रपाल ग्रामविकास कला क्रीडा मंडळ आंबेगाव येथे आज शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हनुमान मंदिर आंबेगाव येथे श्रावणातील दुसऱ्या शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कला क्रीडा मंडळ आंबेगाव यांचं शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे हे तिसरे वर्षे आहे. मुलांना स्टीलचा बॉटल, चित्रकला वही, पेन्सिल, खोदरब्बल, पेन,आलेख वही असे साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाल प्रमुख पाहुणे शैलेश पई होते. त्यांच्या हस्ते मुलानं साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी तेली समाज अध्यक्ष शाम निवेलकर, कला क्रीडा मंडळ अध्यक्ष राहुल राणे, सचिव संदेश कारिवडेकर, कुणकेरी आंबेगाव सोसायटी चेअरमन नामदेव नाईक, मुख्याध्यापक. अस्मिता मुननकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष तेजस्विनी गावडे, शिक्षक प्रदीप म्हाडगुत, नितीन सावंत, प्रशांत कदम, मगदुम, शिक्षिका नाईक व जगदाळे उपस्थित होते.