आंबडवेत जिल्हास्तरीय अपरान्त साहित्य कला संमेलन

Edited by: मनोज पवार
Published on: April 10, 2025 13:09 PM
views 36  views

मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जंयती दिनाचे निमीत्ताने 13 एप्रिल 2025 रोजी साहित्य कला प्रबोधिनी जिल्हा शाखा रत्नागिरी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ आंबडवे यांच्यावतीने आंबडवे येथे जिल्हास्तरीय अपरान्त साहित्य कला संमलेनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमलेनाचे अध्यक्षस्थान संजय गमरे भुषविणार आहेत. उद्घाटन सुदाम सकपाळ यांचे हस्ते करण्यात येणारे आहे. संमेलनाचे स्वागत अध्यक्षपदाची जबाबदारी महेंद्र सकपाळ व सुदर्शन सकपाळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

संमेलन साहीत्यक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले संदेश पवार, सुनील जाधव, राष्ट्रपाल सावंत, नथराम जाधव, किशोर कासारे, विश्वजीत लोखंडे, दादासाहेब मर्चंडे, चंद्राकांत घाडगे, राजेश गमरे, राजेश मर्चंडे, आदेश मर्चंडे, हरेष मर्चंडे, प्रमोद जाधव, शांताराम पवार, मारुती कांबळे यांची उपस्थित लाभणार आहे. संमेलनात पुस्तकावर बोलू काही, अपरांन्त कवी संमेलन, पुस्तक परिचय, संमेलन विचारमंथन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.