कॉलेज ऑफ फार्मसीच्या माजी विद्यार्थ्यांचा १८ जानेवारीला महामेळावा

आमदार शेखर निकम यांची असणार उपस्थिती
Edited by:
Published on: January 03, 2025 19:50 PM
views 172  views

सावर्डे : कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली), सावर्डे या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे १८ जानेवारी २०२५ रोजी Alumini Meet २०२५ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे.  महामेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व MSCDA चे खजिनदार आणि AIOCD चे सहसचिव वैजनाथ जागुष्टे हे उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेशवरचे विकाससम्राट आमदार शेखर निकम हे उपस्तिथ राहणार आहेत. या महामेळाव्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. 

या महामेळाव्यात महाविद्यालयाच्या १९८४ च्या पहिल्या बॅच पासूनचे माजी विद्यार्थी आणि माजी कर्मचारी सहभागी होणार आहेत. महामेळावा समिती सोहळयाचे नियोजन करत असून विविध माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली जात असून आजी माजी विद्यार्थी त्यात सहभागी नोंदवत आहेत. अधिक माहितीसाठी कॉलेजचे प्राचार्य व माजी विध्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय गुलाबराव देसाई (९४२११३८३२३), उपाध्यक्ष नंदकुमार घाग (८०८७११५२३६) आणि सचिव रुपेश गोसावी (९८३७३३२३९०) यांच्याशी संपर्क साधावा. 

कार्यक्रम खालील प्रमाणे

→   दि. १८ जानेवारी २०२५ सकाळी ०९ ते १०.०० नोंदणी. 

→   सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० उद्घाटन, पुनर्मिलन, जुन्या आठवणीना उजाळा आणि सन्मान सोहळा. 

→   दुपारी ०१.०० ते ०२.०० स्नेहभोजन व समूह छायाचित्र. 

→   दुपारी ०२.०० ते ०५.०० सांस्कृतिक कार्यक्रम.