निलेश राणे आमदार होवू देत | विशाल परब यांचे श्री रामेश्वराला साकडे..

मालवणवासियांच्या उत्तम आरोग्याची, शेतकरी, व्यापारी व मच्छीमारांच्या व्यवसाय वृद्धीसाठीही केली प्रार्थना
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 27, 2022 13:33 PM
views 180  views

मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण दैवतांच्या पालखी सोहळ्याची मालवण बाजारपेठ भक्तिमय झाली होती. भाजपचे युवा नेते विशाल परब यानी श्री देव रामेश्वर पालखीचे दर्शन घेत आपले प्रेरणास्थान भाजपचे नेते निलेश राणे हे कुडाळ मालवण मधून आमदार म्हणून निवडून येऊ देत, असे साकडे रामेश्वराला घातले.

पालखी सोहळ्याने बाजारपेठ गजबजून गेली होती. दिवाळी पाडवा व भाऊबीज या अतिशय भक्तीमय वातावरणात हा पालखी सोहळा संपन्न झाला. भाजपचे युवा नेते विशाल परब व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेत भाजपचे नेते निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येवू देत, असे साकडे घातले. तर मालवणवासियांच्या उत्तम आरोग्याची, शेतकरी, व्यापारी व मच्छीमारांच्या व्यवसायात वृद्धीसाठी प्रार्थना केली.

      यावेळी श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण चरणी मालवणवासियांच्या उत्तम आरोग्याची, किनारपट्टी भागातील मच्छीमार व व्यापारी वर्गाच्या व्यवसायात यश मिळण्याकरिता व शेतकऱ्याना शेतीमधून भरभराट होण्यासाठी विशाल परब यांनी साकडे घातले. यावेळेस विशाल परब यांच्यासोबत दादा साईल, आनंद परब यांनी सुद्धा दर्शन घेतले.