
सिंधुदुर्गनगरी : होमिओपॅथी डॉक्टर्सना आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता देत त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक आणि तेवढांच धोकादायक असल्याने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी करूनही अद्याप दखल न घेतली गेल्याने याच विरोधात मॅग्मो, इंडियन मेडिकल असोसिएशन, मेडिकल स्टुडंट, मार्ड हे सर्व वैद्यकीय अधिकारी 11 जुलै सकाळी 8 ते 12 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत वैद्यकीय सेवांचे काम बंद आंदोलन केले जाणार आहे मात्र इमर्जन्सी वैद्यकीय सुविधा सुरु राहणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे कुडाळ विभागाचे सचिव डॉ. अमोघ चुबे यांनी दिली आहे.
होमिओपॅथी डॉक्टरांनी औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांना ‘’आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता देत त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक आणि धोकादायक असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केला आहे. व या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. तसेच हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली होती व निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, याचाच एक भाग म्हणून 11 जुलै रोजी एक दिवसीय वैद्यकीय संप केला जाणार असल्याचा इशारा आयएमएकडून देण्यात आला होता. याबाबतचे निवेदन आज आयएमए संघटना कुडाळच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात होते.
आयुर्वेद अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून आता होमिओपॅथी डॉक्टरांना औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा सीसीएमपी हा ब्रीज कोर्स पूर्ण केल्यावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. मात्र हा निर्णय सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळणारा आहे. आपत्कालिन परिस्थितीमध्ये चुकीचे औषधोपचार, चुकीचे निदान झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे डॉक्टरांची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आयएमएने फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित असतानाही सरकारने 15 जुलै 2025 पासून हा आदेश जारी करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचे आयएमएने म्हटले आहे राज्य सरकारने तातडीने हा निर्णय मागे न घेतल्यास आयएमएच्या सर्व शाखांच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
एमबीबीएस पूर्ण करणारे डॉक्टर पूर्णपणे वैज्ञानिक आणि पुराव्यावर आधारित उपचार पद्धती शिकतात. बीएचएमएस डॉक्टरांचे शिक्षण पूर्णपणे होमिओपॅथीवर आधारित आहे. त्यांना आधुनिक औषध, शस्त्रक्रिया किंवा आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थापनाचे वैज्ञानिक शिक्षण मिळत नाही. त्यामुळे जर अशा डॉक्टरला ‘आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता मिळाली तर सामान्य रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा आयएमएकडून करण्यात आला आहे व होमिओपॅथी डॉक्टर्सना आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता देत त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय रद्द करण्याची मागणी करूनही दखल न घेतली गेल्याने सर्व वैद्यकीय अधिकारी 11 जुलै सकाळी 8 ते 12 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत वैद्यकीय सेवांचे काम बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे कुडाळ विभागाचे सचिव डॉ. अमोघ चुबे यांनी दिली आहे.