बांद्यात भर वस्तीत मगर

Edited by: लवू परब
Published on: August 02, 2024 08:11 AM
views 238  views

बांदा : बांदा खालची सटवाडी येथे गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ५ फूट मगर रस्त्यावर असल्याचे निदर्शनास आले. यावेळी वनविभागाला याची कल्पना देताच वनविभागाने याची घटना स्थळी जाऊन ग्रामस्थांच्या सहाय्याने मगरीला पकडले व व येथील जवळच्या नदीत सोडून जीवदान दिले. 


वनवीभागाचे अधिकारी कर्मचारी घटना स्थळी आले. त्यांतर दोरीच्या सहाय्याने व ग्रामस्थांच्या मदतीने त्या मगरीला पकडण्यात यश आले. यावेळी वनविभागाचे वनक्षेत्रपाल मदन शिरसागर, वनपाल प्रमोद सावंत, दत्तात्रय शिंदे, संग्राम पाटील, ब्रम्हकुमार भोजणे, बांदा पोलीस हुंबे, ग्रामस्थ दाजी परब, दशरथ परब, आपा परब, लवू परब, अक्षय परब, समीर शिरोडकर, तुषार परब, सहदेव परब, राजू परब आदी ग्रामस्थ उपस्तीत होते.