
वेंगुर्ला : तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायत निवडणूकीत बाळासाहेबांची शिवसेना- भाजपा पुरस्कृत गाव पॅनल हे एकत्रित निवडणूक लढवत असून याबाबतची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षाच्या तालुकाध्यक्ष यांच्याकडून झाल्याची माहिती होडावडा भाजपचे प्रसाद मराठे यांनी दिली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे समर्थक) व भाजपा यांच्या युतीच्या पॅनलची अधिकृत घोषणा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर व भाजपाचे तालुकाध्यक्ष सुहास गंवडळकर यांनी जि. प. सदस्य नितीन शिरोडकर व वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष सुनील दुबळे यांच्या उपस्थितीत केली. या गाव पॅनलचे नेतृत्व बाळासाहेबांची शिवसेने कडून अरविंद नाईक व भाजपाकडून गावप्रमुख प्रसाद मराठे हे करीत आहेत. यामुळे होडावडा ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या या निवडणुकीत मतदारांचा कौलरुपी आशीर्वाद आमच्याच बाजूने राहील व आमचे सर्वच्या सर्व दहा उमेदवार भरघोस मताने निवडून येतील याची खात्री अरविंद नाईक व प्रसाद मराठे यांनी दिली आहे.