सगळे दमले...पण, केसरकर नाही थांबले !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 04, 2024 09:58 AM
views 661  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घेऊन सावंतवाडीच्या मैदानात उतरले. तळपत्या उन्हात महायुतीच्या मंडळीनी बाजारपेठ पिंजून काढली. ४० ते ३८ डीग्री तापमानात कार्यकर्त्यांचा चांगलाच घाम निघाला. परंतू, महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचार सुरूच ठेवला. जसजसा घड्याळाचा काटा पुढे जात होता तसतसे थकलेले महायुतीचे कार्यकर्ते सावली अन् थंडाईच्या शोधात मागे पडत होते. मात्र, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर काही मागे हटले नाही. वय वर्षे ६८ असणाऱ्या दीपक केसरकर यांनी दुपारच्या दोन वाजेपर्यंत नारायण राणेंचा प्रचार सुरू ठेवला. गवळी तिठा इथून सुरू झालेल्या या प्रचाराचा शेवट केसरकर यांनी बाजारपेठेतील भवानी चौकात केला. साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांनी बाजारपेठेतील प्रचाराची सांगता केली. त्यांच्यासोबत संरक्षणासाठी असलेले पोलीस व मोजके कार्यकर्त्येही शेवटपर्यंत कायम होते. यावेळी बाजारपेठेत भर दुपारी दोन वाजता प्रचार करणाऱ्या केसरकरांना पाहून ''सगळे दमले...पण, केसरकर नाही थांबले !'' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, बाबू कुडतरकर, मनोज नाईक, अजय गोंदावळे, बंटी पुरोहित, परिक्षित मांजरेकर, सत्यवान बांदेकर, कुणाल शृंगारे, नंदू शिरोडकर आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.