घोटगेवाडीच्या विकासासाठी यापुढे सर्वतोपरी सहकार्य : मनीष दळवी

Edited by:
Published on: May 16, 2025 14:40 PM
views 48  views

दोडामार्ग : हत्तीबाधीत असलेल्या घोटगेवाडी गावाच्या विकासासाठी यापुढे सर्वतोपरी सहकार्य करणार असून ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर करावे यासाठी पालकमंत्री  नितेश राणे, खासदार व आमदार यांचे माध्यमातून विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.

ग्रामपंचायत कार्यालय व जि. प. दवाखाना घोटगेवाडी या नूतन वास्तूचे उद्घाटन मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, राजेंद्र म्हापसेकर, राजेंद्र निंबाळकर, सेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई भगवान गवस, रामदास मेस्त्री, सरपंच संघटना अध्यक्ष अनिल शेटकर गोपाळ गवस, सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, रत्नाकांत कर्पे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मनीष दळवी म्हणाले की, या गावात हत्तीबाधीत ठिकाणी आपण वेळोवेळी भेट दिली. हा प्रश्न पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडविला जात आहे. यासाठी लवकरच हत्ती मोहीम सुरू करण्यात येणार आहे असे स्पष्ट केले.

यावेळी संजू परब यांनी सांगितले की, आमदार दिपक केसरकर यांनी या भागात गाव विकासासाठी कोट्यवधी रुपये पालकमंत्री असताना निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच या पुढे विकासासाठी कायम प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांचे उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय व जि. प. दवाखाना इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सौरभ देसाई याचा सत्कार करण्यात आला. कीर्ती विद्यालय घोटगेवाडीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच माजी सैनिकांचाही गौरव करण्यात आला. यावेळी परिसरातील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.