
सावंतवाडी : तालुक्यात होत असलेल्या ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या सदस्य पदाच्या एकूण ९१७ उमेदवारी अर्जांपैकी 3 अर्ज छाननी दरम्यान अवैध ठरले. यामध्ये बांदा, डेगवे व ओवळीये ग्रामपंचायतचा समावेश आहे. त्यामुळे सदस्य पदाच्या रिंगणात आता ९१७ पैकी ९१४ उमेदवार राहिले आहेत तर सरपंच पदाचे सर्व १८६ अर्ज वैध ठरलेत. पाच सरपंच बिनविरोध झालेत अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिली.