राणेंची किमया सारी | आडारीत प्रकाशाची विकासवारी !

निलेश राणेंच्या शिफारशीने स्ट्रीट लाईटसाठी चार लाखाचा निधी मंजूर
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 16, 2024 08:59 AM
views 107  views

मालवण : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून कोळंब ग्रामपंचायत हद्दीतील आडारी वाडीत स्ट्रीट लाईटसाठी चार लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण आडारी वाडी प्रकाशमान होणार आहे. याबाबत ग्रामस्थांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. 


आडारी वाडीत स्ट्रीट लाईट बसावी अशी मागणी ग्रामस्थांनी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून निधी चार लाख रुपये निधी देण्याचा शब्द दिला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर यांनी काम मंजुरीसाठी पाठपुरावा केला. चार लाख निधीतून संपूर्ण आडारी वाडी प्रकाशमान होणार आहे. याबाबत ग्रामस्थांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.