उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल अक्षय पार्सेकर यांचा सत्कार

Edited by: विनायक गांवस
Published on: August 30, 2024 13:36 PM
views 81  views

सावंतवाडी : न्हावेली ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झालेल्या युवा कार्यकर्ते अक्षय पार्सेकर यांचा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच पार्सेकर यांनी गावातील विकास कामाबाबत परब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.


पार्सेकर यांची नुकतीच ग्रामपंचायत न्हावेली उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.तरुण तडफदार युवा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. युवा कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची स्थापना व त्याच्या राजकीय व सामाजिक कार्याला प्रोत्साहन म्हणून श्री परब यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पार्सेकर यांनी गावामध्ये विकास कामा संदर्भात विशाल परब यांचे लक्ष वेधले यामध्ये गावातील गणेश तळी तसेच श्रीदेवी माऊली मंदिर परिसरात स्ट्रीट लाईट,सिमेंट बाकडे,गावातील रस्त्यावरील वळणावर बहिर्वक्र आरसे बसवणे तसेच गावातील पंचदेवी मूळवस मंदिर जीर्णोद्धार साठी आर्थिक मदत करणे आदी मागण्या केल्या.परब यांनी या मागण्या लक्षात घेत ते लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या गजानन दळवी यांचाही पुष्पगुच्छ देऊन विशाल परब यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते समीर पार्सेकर रुपेश नाईक तुळसिदास पार्सेकर बंड्या दळवी राज धवन गजानन दळवी संदीप सावंत आदी उपस्थित होते.