न्हावेली उपसरपंचपदी अक्षय पार्सेकर बिनविरोध

Edited by: विनायक गांवस
Published on: August 28, 2024 13:58 PM
views 45  views

सावंतवाडी : न्हावेली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आज नव्याने अक्षय पार्सेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच अष्टविनायक धाऊससकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. न्हावेली ग्रामपंचायतीचे उपसरपंच असलेले संतोष नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदी आज निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने पार्सेकर याची बिनविरोध निवड केली.

यावेळी ग्रामसेवक राजेश परब,माजी उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष नाईक,आरती माळकर, सागर जाधव,सानिका हळदणकर,निकिता परब, राजश्री कालवणकर, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन दळवी, युवा सामाजिक कार्यकर्ते समीर पार्सेकर, ओम पार्सेकर, सुंदर पार्सेकर, रुपेश नाईक, तुळशीदास पार्सेकर,विठ्ठल परब, राज धवन, सिद्धेश पार्सेकर, धनेश नाईक, अतुल चौकेकर,ग्रा.प कर्मचारी संतोष निर्गुण, पप्या आरोंदेकर, विनायक कालवणकर, आदी उपस्थित होते. उपसरपंच पदी निवड झालेले पार्सेकर हे न्हावेली गावातील एक युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहे गावातील विविध समस्यांना वेळोवेळी वाचा फोडण्याचे काम ते आपल्या माध्यमातून करत आहेत. त्यांची निवड झाल्याने गावातून तसेच मित्र परिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.