
सावंतवाडी : प्रतीपंढरपूर सावंतवाडीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामधील अखंड हरिनाम विणा सप्ताहाची सांगता रविवारी १४ जुलै रोजी होणार आहे. गेले सात दिवस हा अखंड हरिनाम विणा सप्ताह सुरू आहे. विठ्ठल रखुमाई मंदिरात शुक्रवारी अर्णव बुवा, गडहिंग्लज व गीतगंधा गाड, गोवा यांचा भक्तीगीत व नाट्य संगीत सुमधूर कार्यक्रम तसेच नवार वारकरी भजन मंडळ, वेंगुर्ला यांचं भजन होणार आहे. शनिवारी महिला भजन, महापुरुष धावडेकर वारकरी भजन, वारकरी भजन सोनसुरे, सिद्धेश्वर भजन मंडळ तळवडे यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी हरिनाम विणा सप्ताहाची सांगता होणार असून यावेळी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल मंदिर सप्ताह उत्सव समितीकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, बुधवारी १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सायं. ६ वा. ह.भ.प. संज्योतताई केतकर पुणे यांच किर्तन होणार आहे. याच वेळेत सलग २१ जुलै पर्यंत त्या किर्तनरूपी सेवा करणार आहेत. रविवारी २१ जुलैला काल्यान सांगता होणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर कमिटीन केलं आहे.