खांबाळेत १७ पासुन अखंड हरिनाम सप्ताह

राज्यभरातील नामवंत किर्तनकारांची उपस्थितीती
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 13, 2024 09:59 AM
views 86  views

वैभववाडी : खांबाळे साळुंखेवाडी येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात १७ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभरातील सुप्रसिध्द किर्तनकारांचे किर्तन भाविकांना ऐकायला मिळणार आहे.सलग ३६ व्या वर्षी हा सप्ताह होणार आहे. खांबाळे साळुंखेवाडी येथे श्रीरामनवमीच्या मुहुर्तावर अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचे आयोजन १७ एप्रिलपासुन करण्यात आले आहे.पारायणाचे हे ३६ वे वर्ष आहे.सप्ताहाची पुर्वतयारी युध्दपातळीवर सुरू आहे.या सप्ताहाचे निमित्ताने राज्यभरातील सुप्रसिध्द किर्तनकारांचे किर्तन भाविकांना ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे.१७ एप्रिलला सकाळी १० वाजता-ह.भ.प.श्रीराम महाराज परब (कुडाळ)१७ एप्रिल रात्री ९. वाजता -ह.भ.प संतोष महाराज राठोड (मुंबई)१८एप्रिल-ह.भ.प ज्ञानराज महाराज म्हात्रे (नवी मुंबई)१९ एप्रिल -ह.भ.प भागवत महाराज साळुंके (आळंदी देवाची)२० एप्रिल –हभप मारूती महाराज कोलाटकर, (रोहा)२१ एप्रिल –बालकिर्तनकार हभप सोहम महाराज सातपुते (बीड)२२ एप्रिल-हभप सौ.गीताजंली ताई झेंडे (अहमदनगर)२३ एप्रिल-सकाळी १० वाजता कृष्णानंद महाराज साळुंखे,खांबाळे, यांचे किर्तन होणार आहे.

१७ एप्रिलपासुन सकाळी ५ ते ७ प्रातस्मरण काकड आरती,सकाळी ८ ते १२ आणि सायकांळी ३ ते ५ सामुदायिक ज्ञानेश्वरीचे पारायण,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ,सायंकाळी ७ ते ७.३० आणि रात्री ११ नंतर स्थानिक भजने,२३ एप्रिलला या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.या कार्यक्रमाला सर्व वारकरी साप्रदांयातील वारकऱ्यांसह भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री.देव विठ्ठल रखुमाई भक्ती सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.