विठ्ठल-रखुमाई मंदिरात अखंड हरिनाम वीणा सप्ताह

Edited by: विनायक गांवस
Published on: June 28, 2025 20:09 PM
views 174  views

सावंतवाडी : प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात अखंड हरिनाम वीणा सप्ताहास उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांनी अखंड हरीनाम जप केला जात आहे.

पहाटे काकड आरती, भजन, किर्तन, अभंग गायन आदींसह विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. महिलांच भजन मंडळ देखील यात सहभागी झाले असून त्या विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन गेल्या आहेत. या सप्ताहानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्युत रोषणाईन मंदीरात लखलखाट पसरला असून प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. आषाढी एकादशीला भव्य सोहळा मंदिरात साजरा केला जाणार आहे.