
सावंतवाडी : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्याकडून मळेवाड जकातनाका येथे गाव मर्यादित आकाश कंदील स्पर्धा तसेच आमंत्रित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आकाश कंदील स्पर्धा ही पर्यावरण पूरक असणार आहे याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.तरी मळेवाड कोंडुरे गावातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आकाश कंदील स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे.तसेच नरकासुर स्पर्धेसाठी मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांच्याकडून करण्यात आले आहे.नरकासुर स्पर्धेकरिता प्रत्येक सहभागी निमंत्रित नरकासुर स्पर्धकाला आयोजकांकडून रोख रक्कम,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.










