
सावंतवाडी: उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना सावंतवाडी शहर ग्राहक मंच संरक्षण कक्षाचे शहर प्रमुख अजित सांगेलकर यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला 'जय महाराष्ट्र!' करत शिवसेनेत प्रवेश केला. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सावंतवाडी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, सचिव परीक्षित मांजरेकर, माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर आदी उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर मैदानात उतरले असून शहरात उबाठाला त्यांनी धक्का दिला आहे.











