
सावंतवाडी : सावंतवाडीत 'मविआ'ची बैठक झाली. खासदार विनायक राऊत यांनी यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे, शालेयशिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर जहरी टीका केलीय. तसेच, विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलंय.
भाजप व गद्दार गटाकडून माझ्यावर टीका होत आहे. होय, मी भजनीबुवा आहे. अभंग गाण, भजन करण पाप नाही. यासाठी भाग्य लागतं. तोंडातून काय बाहेर पडावं हे महत्त्वाचे असतं असं सांगत कणकवलीचे विखारी म्हणत आमदार नितेश राणेंवर नाव न घेता जहरी टीका त्यांनी केली. फुटणाऱ्यांची काळजी करायची नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आज दिसत आहे. अजित पवार, दीपक केसरकरांची वाटचाल विसर्जनाकडे सुरू आहे. इथल्या आमदारांच्या हातचं, घरचं काही खावू नका असा सल्ला मला हितचिंतकांनी दिला होता. त्याप्रमाणे मी ते पाळले म्हणून आज आपण सोबत आहोत अशी जहरी टीका त्यांनी केसरकरांवर सावंतवाडीत केली.
मोठेपणाची घमेंड आम्हाला नाही. प्रत्येकांच्या सुख दुःखात मी सहभागी होतो. खासदार म्हणून मी आणि तुम्ही यात अंतर नाही. दुजाभाव नाही. ही आघाडी कायम राहील, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ती भक्कम असेल असं विधान विनायक राऊत यांनी केले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, बाळा गावडे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, रूची राऊत, सावली पाटकर, बाळ कणयाळकर, हिदायतुल्ला खान, विशाल जाधव आदी उपस्थित होते.










