अजितदादांनी समाजकारण जोपासत राजकारण केले : अबीद नाईक

शिबिरात सुमारे ३०० जणांनी केली तपासणी
Edited by:
Published on: July 29, 2024 09:41 AM
views 162  views

कणकवली : केवळ आरोग्य शिबीर घेऊन न थांबता येथील गरजू रुग्णांना औषधेड़ी मोफत बाटप करण्यात येणार आहे. जानचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताह साजरा करण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केली होती त्यानुसार सध्या पावसाळी वातावरणामुळे वाढणाऱ्या आजारांवर औषधोपबार मोफत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य शिबीर व नेत्रतपासणी आज येथे करण्यात येत आहे. नेत्र तपासणी शिबिरातून मोतिबिंदूच्या रुग्णांवर मोफत शखक्रियाही करण्यात येणार आहेत. राजकारण हे राजकारणापुरते मर्यादित ठेऊन सर्वसामान्य जनतेच्या हिताचे समाजकारण करण्याचे काम करणे, हाच यामागचा हेतू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी कसबण येथे केले.

राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यातील कसबण येथे गणपती मंदिरनजीकच्या हॉलमध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आरोग्य शिबीर, मोफत औषध वाटप, नेत्रतपासणी शिबीर घेण्वात्त आले. यावेळी श्री. नाईक बोलत होते. शिबिरात सुमारे ३०० जणांनी तपासणी करून घेतली त्यांना मोफत औषधेही वाटण्यात आली. नेत्र तपासणी केलेल्या काही लोकांना मोतीचिंदू असल्याचे आढळून आले. या सर्व रुग्णांबर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित राज्यात सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यन्न अबीद नाईक यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लास मिळावा, या उद्देशाने कसवण येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

यावेळी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अपावकर, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब प्रांतिक सदस्य विलास गायकर, जिल्हा उपाध्यक्ष सुमाष उर्फ बाबू सावंत्, संदीप राणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर (कणकवली) वैमव रावराणे (वैमबवाडी) नाथा मालंडकर (मालवण), आर. के. सावंत (कुडाळ) उदय मोसले (सावंतवाडी) संदीप पेडणेकर (वेगुर्ले), रशीद खान (देवगड) सत्यवान गवस (दोडामार्ग), ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जस्तम खतीब, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण, जिल्हा सचिव सतीश पाताडे, प्रसाद कुलकर्णी, खरिपाटण ग्रा. पं. सदस्य सुधाकर ढेकणे, महिला कणकवली तालुकाध्यक्षा स्नेहल पाताडे, महिला कुडाळ तालुका उपाध्यक्षा उमा पुरी, युसुफ खान, कणकवली शहर अध्यक्ष इमरान शेख, जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक, शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, सचिन अडुळकर, नितीश सावंत, शहर युबक अध्यक्ष निशिकांत कडुलकर, बाळू मेरबी, अंकुश मेस्त्री, उदय सावंत, तालुका सचिव किशोर घाडीगांवकर आदी उपस्थित होते.

अबीद नाईक पुढे म्हणाले, शिबिराचा फायदा ग्रामीण भागातील गरजवंत लोकांना होईल, हा मूळ हेतू आहे अजितदादा हे सर्वसामान्य लोकांची कामे मार्गी वेळावेळी लावत असतात, अजितदादांनी महायुती सरकारच्यावतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलावर्गाला मोठा दिलासा दिला आहे. त्याचा फायदा माता मंगिणींनी करून घ्यावा त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांना सुद्धा अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी अर्थखात्यातून तरतूद केली आहे. एम. के. गावडे म्हणाले, अजितदादांच्या वाढदिनानिमित गरजूंना आरोग्यसेवा त्यांच्या गावात जवळ उपलब्ध व्हावी यासाठी हे शिबीर क्रसबण या गावात घेण्यात येत आहे. शासनाच्या लाडकी बहीण योजनेचाही सर्व महिलानी लाम ध्यावा अणावकर म्हणाले, अजितदादा पवार हे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणारे नेते आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जजितदादांचे सहकार्य घेण्यात येईल. आजच्या आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाम घेऊन खतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रज्ञा परब म्हणाल्या, कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांचे खतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते यासाठी जशा शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी तपासणी करून घ्यावी लाडकी बहीण योजना आर्थिक सबळ करणारी आहे. या योजनेत सर्वांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले. सूत्रसंचालन व आमार प्रदर्शन विलास गांवकर यांनी केले.