बांद्यात भर वस्तीत अजगर

Edited by:
Published on: November 24, 2024 15:33 PM
views 341  views

सावंतवाडी : येथे बांदा नाका परिसरात शनिवार दुपारी भर वस्तीत एक भला मोठा अजगर आढळून आला. या अजगराला पाहून सर्वांची तारांबऴ उडाली. यावेळी तेथील लोकांनी सावंतवाडी येथील सर्पमित्र नवीद हेरेकर यांना संपर्क केला. यावेळी हेरेकर यांनी लगेच तिथे दाखल होत अजगराला पकडले. हा अजगर ९ फुट लांब व मादी जातीचा होता असे हेरेकर यांनी सांगितले. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

यावेळी हेरेकर यांना अजगराला पकडायला त्यांचा विद्यार्थी पियूष निर्गुण याने मदत केली. श्री. हेरेकर हे आपल्या  ' हेरेकर क्लासिस ' च्या माध्यमातून मुलांचे केवळ शैक्षणिक नाही तर सामाजिक विकास देखिल करत आहेत.