आजगाव अध्यापक विद्यालयाचे प्रा. वाणी यांना पितृशोक

Edited by: रुपेश पाटील
Published on: January 29, 2023 14:19 PM
views 285  views

सावंतवाडी : तालुक्यातील विद्या विकास अध्यापक विद्यालय, आजगावचे प्रा. बी. आर. वाणी यांचे वडील, माजी सैनिक तथा प्रगतीशील शेतकरी रामू भरमाणा वाणी (वय ८४ वर्षे, राहणार - तुडये, ता. चंदगड ) यांचे शनिवारी रात्री १२.४५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांनी  १९५७ ते १९६५ या काळात सैनिक म्हणून देशसेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात २ मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. आज रविवारी त्यांच्यावर तुडये येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.