
सिंधुदुर्ग : कार्यतत्पर अधिकारी अशी माजी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची सिंधुदुर्गात ओळख आहे. जनसेवेसाठी सदैव तत्पर हीच त्यांची खासियत. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाने बांधकाम विभागाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला होता. 7 मे रोजी अजयकुमार सर्वगोड यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते ) सदाशिव साळुंखे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं.
सन्मान स्वीकारल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानलेत. सार्वजनिक विभागात काम करताना कर्मचारी बांधवांचं सहकार्य लाभलं. पत्नी आणि कुटुंबामधील सर्व सदस्य, सर्व पत्रकार बांधव लोक प्रतिनिधी, आदरणीय तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, सध्याचे विद्यमान सिंधुदुर्ग जिल्हा चे पालकमंत्री आदरणीय नितेश राणे साहेब, सर्व बांधकाम विभागतील अभियंता वर्ग, मित्र मंडळी यांच्या सहकार्यामुळे मला हा पुरस्कार मला मिळाला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्यात.