
सावंतवाडी : शिवसेना प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार अजय गोंदावळे, पुजा आरवारी यांनी प्रचारात आघाडी घेतली. जनता आपल्यासोबत असून नगराध्यक्षांसह नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतील असा विश्वास श्री. अजय गोंदावळे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, माजी मंत्री आम. दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब यांची साथ आम्हाला आहे. जनता आमच्यासोबत असून विजय शिवसेनेचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार सौ. पुजा आरवारी, शितल गोंदावळे, संतोष मठकर, आकाश गोंदावाळे, प्रफुल्ल गोंदावळे, ज्ञानेश्वर पाटकर, क्रिश सावंत, अरूण पडवळ, साईप्रसाद राऊळ, अमन बार्देशकर, ज्ञानेश्वर चौगुले, बसत्याव फर्नांडिस, नेवीस परेरा, निकिता परब, अमित आरवारी, संजय गोसावी, संजना आंबेरकर आदी उपस्थित होते.










