
सावर्डे : कला व विज्ञान महाविद्यालय सावर्डे यांनी रेड रिबनच्यावतीने सावर्डे परिसर व बाजारपेठ येथे एड्स विषयी रॅली काढण्यात आली. यावेळी संयम पाळा एड्स टाळा अशा प्रकारच्या घोषणा देण्यात. आल्या तसेच सावर्डे बाजारपेठ येथे एड्स विषयी समज गैरसमज आणि प्रबोधन याविषयी पथनाट्य सादर केले.
सावर्डे सहान येथे पथनाट्य सादर केले त्यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व परिसरातील लोक उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. तेजस्विनी भंडारी प्रा. सुनील जावीर प्रा.शेबेकर, काजरोळकर कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक टी. वाय.कांबळे उपस्थित होते.