
रत्नागिरी : आपल्या देशामध्ये हरितक्रांती सन १९६० च्या दशकामध्ये झाली. देशाची ५२% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. महाराष्ट्र मध्ये हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री कै. श्री. वसंतराव नाईक यांची जयंती दरवर्षी आपल्या राज्यामध्ये ‘महाराष्ट्र कृषी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ येथे दिनांक १ जुलै २०२५ रोजी ‘कै. श्री. वसंतराव नाईक’ यांची जयंती साजरी करण्यात आली. संशोधन केंद्र प्रमुख, डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली ‘वसंतराव नाईक’ यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिवादन केले.
त्यानंतर शासन निर्देशानुसार ‘कृषि सप्ताह’ निमित्त विशेष ‘वृक्षारोपण’ मोहीम आखण्यात आली. सदर ‘कृषि सप्ताह’ दिनांक १ ते ७ जुलै रोजी साजरा करण्यात आला. ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ झाडगाव येथील प्रक्षेत्रावर जागेच्या उपलब्धतेनुसार वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नारळ, बदाम, जांभूळ अशा फळ झाडांची आणि शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. आसिफ पागारकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक), डॉ. हरिष धमगये (अभिरक्षक व प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. व्ही. आर. सदावर्ते (जीवशास्त्रज्ञ), श्रीम. ए. एन. सावंत (वरिष्ठ संशोधन सहाय्यक) तसेच श्री. रमेश सावर्डेकर (वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक) यांनी विशेष सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाकरिता श्री. महेश किल्लेकर (यंत्र चालक बोट), श्री. मनिश शिंदे (मत्स्यालय यांत्रिक), श्रीम. जे. जे. साळवी (वरिष्ठ लिपिक), श्री. सचिन पावसकर (लिपिक), श्री. दिनेश कुबल (बोटमन), श्री. सुहास कांबळे व श्री. राजेंद्र कडव (शिपाई), श्री. सचिन चव्हाण (मजूर), श्री. प्रवीण गायकवाड (क्षेत्र संग्राहक), श्री. तेजस जोशी, श्री. योगेश पिलणकर, श्री. स्वप्नील आलीम, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. अभिजित मयेकर आणि श्री. दर्शन शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.