कृषी दिनानिमित्त वृक्षदिंडी !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 03, 2024 11:02 AM
views 105  views

सावंतवाडी : कृषी दिनानिमित्त माडखोल धवडकी शाळा न. २ धवडकी आणि किर्लोस येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.

कृषी दिनानिमित्त ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषीदुतांनी कृषिदिन साजरा केला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका व शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्याक्रमाची सुरवात वृक्षदिंडीने झाली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भावना गावडे, शिक्षिका समीक्षा राऊळ, वैदेही सावंत, शिक्षक अरविंद सरनोबत यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, प्रा. महेश परुळेकर, प्रा. गोपाल गायकी प्रा. भावना पाताडे प्रा. विवेक खरात प्रा. सुयेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत सर्वेश सावंत, योगेश तेली, अदित्य खताळ, सौरभ टेंगले, समीर कुथे, स्वप्निल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना कृषिदिनानिमित्त मार्गदर्शन करताना कृषिदिनाचे महत्व पटवुन दिले.