जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक होणार बिनविरोध ?

राज्यभरात घमासान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र यशस्वी शिष्टाई | चक्क ठाकरे गटाचीही भाजपसोबत हातमिळवणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 21, 2023 09:06 AM
views 330  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होतेय बिनविरोध // एकूण १६ जागांवर भाजपसह सर्वच पक्षांची वाटाघाटी // जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह सर्वच संचालकांनी केली यशस्वी शिष्टाई // १६ जागांपैकी भाजपच्या वाट्याला ९ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ३, शिंदे शिवसेनेला २, काँग्रेस आणि ठाकरे गटाला प्रत्येकी १ जागा // आज होणार अधिकृत घोषणा // राज्यभरात याच निवडणुकीसाठी अनेक उमेदवार बसले आहेत एकमेकांच्या उरावर // मात्र, राजकियदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हीच निवडणूक होतेय बिनविरोध // चक्क ठाकरे गटाचीही भाजप सोबत हातमिळवणी // बिनविरोध निवडणुकीसाठी जिल्हा बँकेत मागील दोन दिवस सुरु होते डावपेज // अखेर सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावरुन झाली यशस्वी शिष्टाई // जिल्ह्यातील ८० टक्के ग्रामपंचायती ताब्यात असतानाही भाजपने बिनविरोध निवडणुकीसाठी घेतला पुढाकार // १० हजाराहून अधिक ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे आहेत मतदार // मोठं संख्याबळ आपल्याकडे असतानाही भाजपने बिनविरोधची खेळली खेळी // ही निवडणूक म्हणजे जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची होणार नांदी //