गव्यारेड्यांकडून शेतीचं नुकसान ; शेतकऱ्यांना मिळाली मदत !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 04, 2024 06:25 AM
views 351  views

देवगड : देवगड चाफेड येथील पिंपळवाडी ‘उंचावळा’भागातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी वायंगणी शेतीचे गवा रेड्यानी अक्षरशः नासधूस करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. याबाबत सरपंच आणि पोलीस पाटील यांनी वनविभागा मार्फत रीतसर पंचनामा केला. यानंतर शेतकऱ्यांना सुमारे १८००० रू नुकसान भरपाई मिळाली.

यंदाच्या उन्हाळी हंगामात येथील शेतकरी प्रदीप महादेव घाडी, प्रकाश सखाराम पाटील, दीपक जयराम राणे, मंगेश कृष्णा साळकर आदी शेतकऱ्यांचे बागायतीचे गवा रेड्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. याबाबत येथील शेतकऱ्यांनी सरपंच किरण मेस्त्री यांचे लक्ष वेधले असता सरपंच आणि पोलीस पाटील संतोष सावंत तसेच सबंधित वनविभागाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचयादी तयार केली. तसेच सरपंच यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे या शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार रुपये मिळाले. चाफेड येथील या शेतकऱ्यांन कडून या बाबत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे विशेष आभार मानले आहेत.