पीक विम्याच्या रकमेसाठी आंदोलन...!

Edited by:
Published on: September 12, 2023 13:31 PM
views 267  views

सिंधुदुर्गनगरी : गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची 120 कोटी रुपये रक्कम मिळालीच पाहिजे या मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने व आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

या आंदोलनाला  जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, राजु शेट्ये, वैदही गुडेकर, रुपेश आमडोसकर, सिद्धेश राणे, वैभव मलांडकर, निशार शेख, आदी उपस्थित राहिले आहेत.

आंबा काजू शेतकऱ्यांच्या पीक विमा मिळायला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, जय भवानी जय शिवाजी, कोण म्हणतो देणार घेतल्याशिवाय राहणार अशा घोषणा देण्यात आल्या.