
देवगड : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यां कडून या गोष्टीचे राजकारण करण्यात आले हे दुर्दैवी आहे.यामुळे देवगड भाजप च्या वतीने आज त्यांचा निषेध करण्यात आला. देवगड येथे मा.आ.अजित गोगटे यांच्या नेतृत्वाखाली आज देवगड मध्ये तालुका भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेटे, तालुका प्रभारी संतोष किंजवडेकर,भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे,अमित साटम,वैभव कळंगुटकर,देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल,वार्ड क्रमांक 11 मधील पदाधिकारी दिलेश साटम,पंकज दुखंडे , माजी सभापती रवी पाळेकर, राजा वालकर,उल्हास मंचेकर, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दयानंद पाटील,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, शहराध्यक्ष योगेश पाटकर, कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ताम्हणकर,महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुसकर,माजी नगराध्यक्ष प्रियांका साळस्कर, संजना आळवे,नगरसेविका तनवी चांदोसकर, तन्वी शिंदे, व इतर महिला पदाधिकारी तालुका पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या .निषेधाचे विविध फलक यावेळी फडकवण्यात आले होते.