राजकारण्यांसाठी त्रस्त सावंतवाडीकरानं लावला बॅनर !

चर्चा तर होणारच !
Edited by: विनायक गावस
Published on: August 06, 2023 14:49 PM
views 1052  views

सावंतवाडी : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच पुढे काय झालं ? हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यात एक्सप्रेससह रेल्वे गाड्यांना सावंतवाडीत मागणी असूनही थांबा मिळत नाही आहे. तर बसस्थानकाच्या दुरावस्थेकडे देखील प्रशासन गांभीर्याने पाहत नाही आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या सावंतवाडीकरानं अखेर ''सावंतवाडीचा वाली कोण ?'' सावंतवाडी रेल्वे स्टेशन व बस स्थानक म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळ ! अशा आशयाचा बॅनर सेल्फी पॉईंटसह गांधी चौकात लावला आहे. त्रस्त सावंतवाडीकरांची भावना व्यक्त करणारे मोक्याच्या ठिकाणचे हे बॅनर चांगलेच चर्चेत आले आहेत. 


सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच काम पूर्णत्वास आलेल नाही. गेली अनेक वर्षे हा प्रश्न रखडलेला आहे. रेल्वे गाड्या, एक्सप्रेसला थांबा मिळावा अशी मागणी असताना त्याला केराची टोपली दाखवली जात आहे. केवळ ९ गाड्यांना सावंतवाडीत थांबा दिला जातोय‌. एक्सप्रेससाठी सावंतावडीकरांना कुडाळवारी करावी लागते आहे‌. नाहक त्रास यात सहन करावा लागत आहे. यामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर अन्याय होत असल्याची भावना रेल्वे प्रवाशांची आहे. त्यासाठी टर्मिनस पूर्णतःवास याव अशी सावंतवाडीकरांची मागणी आहे. दरम्यान, सावंतवाडी बस स्थानकाची झालेली दुरवस्था व त्याकडे वारंवार होणार दुर्लक्ष याबद्दल देखील संताप व्यक्त केला आहे. कुणीच दखल घेत नसल्यानं शेवटी रेल्वे व एसटी प्रवास करणाऱ्या त्रस्त सावंतवाडीकरान शहरात बॅनर लावू़न आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


सेल्फी पॉईंट, गांधी चौकात हे बॅनर लावण्यात आले आहेत. सावंतवाडीचा वाली कोण ?, सावंतवाडी रेल्वे स्टेशन व बस स्थानक म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळ !! - एक त्रस्त सावंतवाडीकर, सावंतवाडी टर्मिनस म्हणजे धावणाऱ्या रेल्वे पाहण्यासाठी असलेली नयनरम्य जागा होय !, नांदगाव २४ तासाचा आत, सावंतवाडीला १२ वर्षे वाट ?, रेल्वे चे टर्मिनस चोरीस,मिळाल्यास रोख इनाम-सावंतवाडीकर, सावंतवाडी रेल्वे स्टेशन एक उत्तम माशा मारण्याचे ठिकाण, वंदे भारत थांबली पण क्रॉसिंगलाच !, किती दिवस अजून दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून राहायचं ? असे सवाल करत राजकारण्यांनो जागे व्हा ! अस आवाहन यातून केलं आहे. सध्यस्थितीत हे बॅनर चर्चेत असून प्रत्येक सावंतवाडीकरांची भावना व्यक्त करत आहेत.