
सावंतवाडी : गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरात आज पुन्हा एकदा डंपर रुतण्याची घटना घडली. गेल्या आठ दिवसातील वाहने रुतण्याची ही सहावी घटना आहे.शहरात बांदा कट्टा कॉर्नर ते बसस्थानक सेवा रस्त्यावर गॅस कंपनीने खोदलेल्या चरात बाजूपट्टी कमकुवत झाल्याने वाहने रुतून अपघात होण्याचे प्रकार हे गेल्या आठ दिवसात सातत्याने घडत आहेत.
आज सायंकाळी रुक्मिणी सुपर बाजार समोर डंपर बाजूपट्टीत रुतला. चालकाने डंपर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिक प्रमाणात डंपर रुतल्याने डंपर बाहेर काढणे अशक्य बनले. याठिकाणी सातत्याने वाहनांची वर्दळ असून वाहने रुतण्याचे प्रकार वाढल्याने स्थानिकातून कंपनीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.