निवडणूकांनंतर 'रात गयी बात गई' : डॉ. जयेंद्र परुळेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2024 13:13 PM
views 166  views

सावंतवाडी : कोकणात बेरोजगारी आहे असे नारायण राणे यांनी राजापूरच्या सभेत जनतेला संबोधित करताना सांगितले. स्वतः तीन वर्ष केंद्रीय कॅबिनेट मंत्री होता मग, या ठिकाणी उद्योग का उभे राहू शकले नाहीत ? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला. दरम्यान, मंत्री दीपक केसरकर येथील मुलांना आपण जर्मन भाषा शिकवणार असे सांगत आहेत. परंतू, त्यांचे हे आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर आहे. निवडणुका झाल्यावर 'रात गयी बात गई' असा टोला डॉ. परुळेकर यांनी मंत्री केसरकर यांना लगावला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.