
सावंतवाडी : ओटवणे येथिल कुटुंबाला अळंबी खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. त्यांना त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारार्थ गोवा बांबोळी येथे हलविण्यात आल्याची माहिती रूग्णालय प्रशासानाकडून दिली आहे.
अळंबी खाल्ल्याने ओटवणे येथील एकाच कुटुंबातील तिघांना बाधा झाली. ईशा रामचंद्र सोनार (२२) प्रकाश लक्ष्मण सोनार (६०) व रामचंद्र विष्णु सोनार (५५) या तिघांना अळंबी खाल्ल्यानंतर उलटी व जुलाब सुरू झाल्याने त्यांना त्वरित उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांना उपचारार्थ गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.