तब्बल 48 वर्षानंतर SPK त जागल्या कॉलेजच्या आठवणी

Edited by: जुईली पांगम
Published on: May 18, 2023 19:48 PM
views 75  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील SPK कॉलेजमधील आर्ट्स शाखेत 1975 ते 1980 या काळात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळवा 14 मे रोजी SPK मध्ये पार पडला. या मेळाव्याला संस्थेचे युवराज लखमराजे भोसले, कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. द. रा.  कळसुलकर, डॉ. एच. व्ही देशपांडे, डॉ. जी. ए. बुवा, प्रा सुभाष गोवेकर आणि विद्यमान प्राचार्य डॉ. दिलीप भारमल हे व्यासपिठावर होते.  

या मेळाव्यात मोठ्मोठी पदे भूषवून निवृत्त झालेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील 70 पेक्षा जास्त विद्यार्थ्यी उपस्थित होते. पदवीधर होऊन बाहेर पडलेली मुले तब्बल 45 वर्षानंतर आजोबा, आजी झाल्यावर एकत्र येण्याचा हा अविस्मरणीय दिवस होता. शाल, श्रीफळ आणि गुलाब रोपे देऊन गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर पिळणकर यांनी केलं. पिटर डोन्टस यांनी पाहुण्यांचे स्वागत केलं. तर पद्मनाभ परब यांनी आभार मानले. 

दुसऱ्या सत्रात संजय धुपकर ( गोवा ) यांचे गायन, सतीश शेजवलकर यांचे वादन तसेच अन्य विद्यार्थ्यांचे गुणदर्शन झाले. मेळाव्याचे आयोजन, नियोजन आणि सूत्रसंचालन प्रकाश गोवेकर यांनी केलं. डॉ. दिलीप भारमल यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले. या अपूर्व मेळाव्याची उत्तम डॉक्युमेंटरी कोकणचं नं. 1 महाचनेल कोकणसाद LIVE च्या वतीने करण्यात आली. आरंभी विकास गोवेकर यांनी सर्वांच्या आरोग्यासाठी योगाभ्यास घेतला. 

निवृत्त उपसंचालक ( माहिती व जनसंपर्क ) सतीश लळीत, अॅॅड. शिवराम कांबळे , अण्णा शिरोडकर, अश्विनी उटपुरे, अस्मिता स्वार - वर्दम, मीना सामंत, मीरा धडाम, शेखर पाडगावकर, जगदीश मांजरेकर आदींनी मेळाव्याच्या यशस्वीतेसंबंधी बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पुढील वर्षी पुन्हा मेळावा घेण्याचा निर्धार करण्यात आला. सुनील जोशी, शबनम राजगुरू, नंदू पिळणकर आणि शुभांगी नार्वेकर यांनी मेळाव्यासाठी विशेष सहाय्य केलं.