कुडाळात दिशादर्शक बोर्डवर जाहिराती

प्रशासन कारवाई करणार..?
Edited by:
Published on: December 31, 2023 15:29 PM
views 167  views

कुडाळ : उद्यम नगर येथील मुख्य चौकात केंद्रीय महामार्ग प्रशासन व MIDC मार्फत लावण्यात आलेल्या चीपी एअरपोर्ट या दिशादर्शक बोर्डावर काही राजकीय पक्ष तसेच काही खाजगी आस्थापना आपले जाहिरातीचे  बोर्ड लावतात.

मुळात कुडाळ शहरात नव्याने येणाऱ्या पर्यटक तथा नागरिकांना योग्य मार्ग समजावा यासाठी हा साईन बोर्ड आहे. परंतु याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून हे जाहिरातीचे किंवा प्रचाराचे बोर्ड लावणे हे कितपत योग्य आहे? कुडाळ नगरपंचायतीने तसेच  संबंधित यंत्रणेने याकडे एक गंभीर बाब म्हणून त्वरित लक्ष देऊन संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कुडाळ मधील सजग नागरिकांकडून करण्यात येत आहे.