
सावंतवाडी : कारिवडे गावातून तसेच गावागावात मिळणारे प्रेम, पाठिंबा, सन्मान हेच माझ्या कामाचे मुल्य आहे. ग्रामस्थानींही आपण सजग राहून लढा चालू ठेवावा असे प्रतिपादन ॲड. महेश राऊळ यांनी केले.आरोग्य विषयक जनहीत याचिका विनामूल्य लढून शासकीय यंत्रणेला जाग आणणारे प्रतिथयश वकील ॲड. महेश राऊळ यांचा सन्मान ग्रामपंचायत कारिवडे व कारिवडे ग्रामस्थांच्यावतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक माळकर यांनी सांगितले की, आपल्या या आरोग्याविषयक लढ्याला आमच्या गावाचा पुर्ण पाठींबा असुन कारिवडे गावाच्यावतीने चळवळीस सुरुवात झालेली आहे. ॲड. राऊळ यांच्यामुळे आमच्या या चळवळीस अधिक बळ आलेले आहे असे मत व्यक्त केले.त्याचबरोबर सुभेदार मेजर संजय सावंत यांनी ॲड. राऊळ करित असलेल्या कार्याबद्दल कौतुक केले.
ॲड. राऊळ यांनी सांगितले की, आपणकडून मिळणारे प्रेम, पाठिंबा व सन्मान हेच माझे कामाचे मुल्य आहे. तसेच सावंतवाडी तालुक्यातील आरोग्याविषयक अजुन बरेच प्रश्न प्रलंबित असुन त्याबाबत प्रत्येक गावातुन चळवळ उभी राहिली पाहिजे. लढ्याची ही नुकतीच सुरुवात असुन सदरचा लढा अधिक बळकट सामान्य माणसांच्या आशिर्वादाने मी करु शकतो. यावेळी कारिवडे गावचे सरपंच आरती अशोक माळकर, उपसरपंच तुकाराम आमुणेकर, महेश गांवकर, ग्रा.प.सदस्य शंकर मेस्त्री, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सुभेदार मेजर संजय सावंत, प्रशांत राणे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष, बाळा गांवकर,गावप्रमुख, प्रदिप केळुसकर पोलिस पाटील कारिवडेकर, अमोल कारिवडेकर, कारिवडे शाळा नं.१ व्यवस्थापन समिती अध्यक्ष , लवू पार्सेकर माजी ग्रा.प.सदस्य, श्रीम.नाईक पोस्ट मास्टर कारिवडे, भालचंद्र भारमल, अमर धोंड तसेच ग्रा.प.कर्मचारी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.











