ॲड. रुजूल पाटणकर यांना 'इमर्जिंग एज्युकेशन हिरो अवॉर्ड

Edited by: विनायक गावस
Published on: September 15, 2023 19:08 PM
views 106  views

सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रुजूल पाटणकर यांना यावर्षीचा 'इमर्जिंग एज्युकेशन हिरो अवॉर्ड 2023' जाहीर झाला आहे. एज्युकेटर एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क (ईजीएन) या आंतरराष्ट्रीय सामाजिक, शैक्षणिक संस्थेतर्फे अॅड. रुजूल पाटणकर यांना 30 सप्टेंबर रोजी मुंबई येथील रेडिसन ब्ल्यू इंटरनॅशनल हॉटेल येथे रंगारंग अवॉर्ड समारंभात हा महत्त्वपूर्ण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.


अॅड. पाटणकर यांच्या विविध शैक्षणिक प्रयोगांनी प्रभावीत होत EGN या संस्थेमार्फत त्यांच्या मागील आठ वर्षाचा शैक्षणिक प्रवास लक्षात घेता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अॅड. रुजूल पाटणकर यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव्ही होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.