
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर यांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे. सावंतवाडी येथील अनिल निरवडेकर हे गेली ३० वर्ष वकिली व्यवसायात आहेत. न्यायालयाच्या विविध खटल्यांमध्ये त्यांनी आपल्या पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे. वकिली व्यवसायासोबतच ते सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.