
दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील रेशन धान्य दुकानात भेसळ युक्त गहू आल्याने रेशन धारकांनी हे धान्य तहसीलदारांच्या टेबलवर ठेवून निदर्शनास आणला. मात्र हे धान्य जिल्ह्यावरूनच आले असल्याचे सांगत तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी आपल्यावरील जबाबदारी झिडकारत वरिष्ठ पातळीवर बोट दाखविले.
दोडामार्ग तालुक्यातील बऱ्याचशा रेशन धान्य दुकानावर अळ्या पडलेले तांदूळ, दगड व कुजलेले गहु आल्याने रेशन धारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोडामार्ग शहरातील धान्य दुकानावर दगड असलेले व कुजलेले गहु रेशन धारकांना वितरित केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे. याबात शहरातील मिलिंद नाईक यांनी दोडामार्ग तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांची भेट घेऊन चक्क खराब असलेले गहु टेबल ठेऊन निदर्शनास आणून दिले.
ह्या गहु बद्दल तहसीलदार राजमाने यांनी आपल्यावरी जबाबदारी झिडकारत वरिष्ठ पातळीवर बोट दाखविले. मात्र आलेले धान्य हे ग्राहकांना वितरित करावेच लागणार जर धान्य दिले नाही तर पुन्हा यां महिन्याचे धान्य आम्हाला का दिले नाही? असाही प्रश्न रेशन ग्राहकांकडून विचारला जाऊ शकतो असे राजमाने यांनी सांगत आपण वरिष्ठ पातळीवर तसे कळविते असे सांगितले.