
कुडाळ : महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा कुडाळ यांच्या वतीने शिक्षक सन्मान व जाहिर प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे दयानंद नाईक (राज्य उपाध्यक्ष) , यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
नवनियुक्त शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेने शिक्षक भरती होण्यासाठी केलेले सहकार्य आणि सेवेत आल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवलेली कामकाजाची पद्धत याने प्रभावित होऊन शिक्षक भारती संघटना हा विश्वसनीय पर्याय असल्याने शिक्षक भारती संघटनेत स्वेच्छेने सामील होत असल्याची भावना व्यक्त केली. कुडाळ तालुक्यातील 73 कार्यरत नवनियुक्त शिक्षकांपैकी 59 शिक्षकांनी आज जाहीर प्रवेश केला. उर्वरीत लवकरच प्रवेश करतील, असा विश्वास कुडाळ तालुका अध्यक्ष श्री. विनेश जाधव यांनी व्यक्त केला आहे. व कार्यकारिणी विस्तार देखिल यावेळी कऱण्यात आला.
यावेळी शिक्षक भरती लढ्यातील अग्रणी राधिका जगदाळे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, दयानंद नाईक यांनी सभागृहास मार्गदर्शन केले.यावेळी राज्य संघटक किसन दुखडे, प्राजक्ता कनयाळकर, शितल परुळेकर,कुडाळ तालुका सचिव रामचंद्र धुरी व कार्यकारिणी, महिला आघाडी अध्यक्षा प्रीती सावंत, सन्मा. संतोष कोचरेकर, मालवण तालुक्यातील पदाधिकारी व शिक्षक भारती संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.