कौतुकास्पद | माडखोल धवडकी शाळेचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

Edited by: विनायाक गावस
Published on: July 02, 2023 17:10 PM
views 126  views

सावंतवाडी : माडखोल धवडकी शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. शाळेच्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा खोवला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती ( इ. ५ वी स्कॉलरशीप) परीक्षेत आमच्या माडखोल नं. २, धवडकी या शाळेचे दोन विद्यार्थी कु. नम्रता नागेश सावंत व साहिल लक्ष्मण बरागडे हे विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत. या विद्यार्थांच्या या उत्तुंग यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्री‍ भावना गावडे, अध्यक्ष श्री. उदय राऊत, पालक - शिक्षक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्य आहेत.